परिस्थिती सुधरेल की जैसे थे राहील ?
भद्रावती
मागील कित्येक वर्षापासुन माजरी गावच्या रस्ताचे काम अथवा डागडुजी सुद्धा करण्यात आली नव्हती. माजरी एरीया हाॅस्पिटल पासुन ते शिरना नदी व रेल्वे स्टेशन रोड पर्यंतचा मुख्य रस्ता पुर्णता खराब झाला असुन गाव प्रशासनाने तर कानाडोळा केला आहे . तरी आता दि ३० नोव्हे. ते १ डीसेंबर गावातील मुख्य रस्त बंद राहनार आहे. ह्याचे कारण म्हणजे रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. म्हणुनच २ दिवस वाहनांसाठी रस्ता बंद राहणार आहे. हे होउनही जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे कि ह्या मार्गाने मोठ्या प्रमाणात जड वाहतुक होत असते तसेच शेंबळ टोल व नंदुरी टोल वाचविण्यासाठी वणी मार्गे मोठ्या प्रमानात जड वाहतुक माजरी मुख्य वस्ती मधुन होत असते. त्यामुळे रोड त्या जड वाहनाचे वजन सहन करील की पुन्हा रस्त्याची दुर्वस्था होईल अशी शंका निर्माण झाली आहे.
ह्या बाहेरुन येणार्या वाहनांमुळे माजरी गावात मोठ्या प्रामानात प्रदुषण होत आहे. माजरी ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणुन ओळखल्या जाते. मात्र १७ लोकप्रतीनिधी असुन कोणीच ह्यावर बोलतांना, तोडगा काढतांना दिसत नाही ? असा संतप्त सवाल माजरीतील जनता करत आहेत. ह्या खराब रस्तामुळे जिवाला मोठे नुकसान तर होतेच परंतु प्रदुषणामुळे लोकांचे स्वास्थ बिघडत चालले आहे. त्या मुळे कुणाची जिवीत हानी होत नाही तो पर्यंत कुणाला जाग येणार नाही असेच वाटत आहे. तरी हा मुख्य रस्ता लवकरात लवकर दुरुस्त व्हावा म्हणुन गावकर्यांची इच्छा व प्रतिक्षा संपत आल्याचे चित्र दिसत आहे. पण प्रदुषण थांबेल काय? माजरी मार्गे गावाबाहेरील मोठे जड वाहन वाहतुक थांबेल काय? हे प्रश्न गावकरी करीत आहेत. तसेच ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी गावातून होणाऱ्या जड वाहतूकीस प्रतिबंधक उपाय योजना करतील काय अशी शंका उपस्थित केली जाते.






