spot_img
spot_img
25.4 C
New York
Saturday, June 13, 2026

श्रावणी पडोळे भंडारा जिल्हात द्वितीय

सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

आज सीबीएससी दहावीचा निकाल जाहीर झाला . भंडारा जिल्ह्यातील बऱ्याच सीबीएससी शाळांचा निकाल हा उत्तम लागला . रॉयल पब्लिक स्कूल भंडारा येथील विद्यार्थिनी कु.श्रावणी टेकराम पडोळे ही ९८.६०% गुण घेत भंडारा जिल्ह्यात गुणवत्ता यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राॅयल पब्लिक स्कूल भंडारा येथुन ती प्रथम आली आहे. कठीण समजल्या जाणाऱ्या संस्कृत व सोशल सायन्स या दोन्ही विषयांत तिने १०० पैकी १०० गुण प्राप्त केले.

भंडारा पंचायत समितीचे माजी सदस्य श्री टेकराम पडोळे गुरूजी यांची कन्या कु. श्रावणी पडोळे ही भंडारा जिल्ह्यात गुणवत्ता यादीत दुसऱ्या क्रमांकावर आल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रॉयल पब्लिक स्कूल भंडाऱ्याच्या प्राचार्य तसेच प्राध्यापक, शिक्षकांनी शाळेतून प्रथम व जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर आल्याने तिचे अभिनंदन केले. भंडारा जि.प.च्या सदस्या सौ.मनिषा निंबार्ते , डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. ज्ञानेश हटवार आदींनी तिचे अभिनंदन केले. आपल्या यशाचे श्रेय तिने आई , वडील, आजोबा व शिक्षकांना दिलेले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीने जिल्ह्यात द्वितीय स्थान प्राप्त करत भरघोस यश संपादन केल्याने तिचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!