विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा समावेश..
मुंबई :- दि. १४ सप्टेंबर,
महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आणि मराठी विषयासाठी कार्यरत असलेला महाराष्ट्र राज्य मराठी विषय शिक्षक महासंघ हा राज्यभर कार्यरत आहे.
याच मराठी विषय शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार , कोषाध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे , नागपूरच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. शालिनी तेलरांधे, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रा.यशवंत पवार , नागपूरच्या पदाधिकारी प्रा. वैशाली देशमुख या पदाधिकाऱ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेत राज्य स्तरीय गुरुरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असलेल्या औदुंबर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था नागपूरच्या वतीने विदर्भातील या पदाधिकाऱ्यांना दि. 13 सप्टेंबर 2026 ला वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे, आयोजित गुणगौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गुरुरत्न पुरस्कार- 2026 देऊन सन्मानित करण्यात आले.
शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात काम करित असलेल्या या सर्व पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन, राज्य स्तरीय गुरुरत्न आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, सन्मान शेला व भेटवस्तू असे होते. तसेच या ठिकाणी या कार्यला अंतीम स्इवरुप देण्यासाठी तज्ञ परिक्षक मान्यवरांनाही पुरस्कार देऊन सन्मानित केले.
गुरु रत्न आदर्श शिक्षक पुरस्कार गुणगौरव सोहळ्यात औदुंबर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती.भाग्यश्री पवार ( ढवळे ), नागपूर चे आमदार विकास ठाकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, मा. शिक्षणाधिकारी रमेश हरडे, अग्रवाल मोटीवेशनल स्पिकर दिल्ली, मा. मनोज कुंभारे, श्रीमती माधुरी पालीवाल, श्री. अनिल शिवणकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विदर्भातील मराठी विषय शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल औदुंबर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, पुरस्कार निवड समितीचे सर्व सदस्य, विज्युक्टा महासचिव प्राचार्य डॉ. अशोक गव्हाणकर, महासंघाचे सचिव प्रा.बाळासाहेब माने ( मुंबई ), सल्लागार प्राचार्य संजय पाटील रायगड, कोषाध्यक्ष प्रा. दिलीप जाधव, समन्वयक डॉ पांडुरंग कंद, कार्याध्यक्ष प्रा. संपत गर्जे , सल्यांलागार प्रा. अंकुश प्रकाश, नागपूर चे सचिव प्रा. संजय तिजारे यांच्यासह मराठी विषय शिक्षक महासंघाचे सर्व पदाधिकारी इत्यादींनी अभिनंदन करून भरभरून शुभेच्छा दिल्या.






