भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे आयोजन…
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीच्या वतीने नवनिर्वाचित पदवीधर आमदार ऍडवोकेट अभिजीत वंजारी यांचा अभिनंदन सत्कार समारोह यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
नवनिर्वाचित पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांच्या या अभिनंदन सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती तथा सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सत्कारमूर्ती पदवीधर आमदार ऍडव्होकेट अभिजीत वंजारी व शिक्षक आमदार सुधाकर अडबाले हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ विवेक शिंदे म्हणाले की, पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांचा विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे. सत्कारमूर्ती पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांचा सत्कार भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांनी शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन केले. सत्काराला उत्तर देताना पदवीधर आमदार अभिजीत वंजारी यांनी पदवीधरांचे, बेरोजगारांचे तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न विधानसभेत सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महाराष्ट्रात मराठी भाषा व मराठी शाळा संपवण्याचा डाव आम्ही कदापि सहन करणार नाही. आपले प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासित केले.
याप्रसंगी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सुद्धा शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित समस्यांच्या बाबतीत मार्गदर्शन केले. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन दिली. मात्र शिक्षकांना त्यातून वगळले, हा त्यांच्यावर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. शिक्षक बंधवांना जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय आम्हाला चैन मिळणार नाही, असे मार्गदर्शन केले. खऱ्या अर्थाने आता आमची जबाबदारी वाढली असेही ते म्हणाले.
या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले. याप्रसंगी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव डॉ. कार्तिक शिंदे, विश्वस्त, माझी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष शिंदे बल्लारशा, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, वि मा सी चे जिल्हा, तालुका पदाधिकारी , तसेच भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती अंतर्गत चालणाऱ्या महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यालय तथा प्राथमिक विद्यालयाचे समस्त प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विमाशीचे सदस्य या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.






