spot_img
spot_img
8.3 C
New York
Sunday, November 29, 2026

अभिजात मराठी भाषा गौरवदिन भंडारा येथे संपन्न…..

गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व मराठी विषय शिक्षक कार्यशाळा उत्साहात संपन्न…

भंडारा

       3 ऑक्टोंबर, अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने, मराठी विषय शिक्षक असोसिएशन, भंडारा द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व मराठी विषय शिक्षक कार्यशाळा दि. ४ ऑक्टोंबर २०२६ ला जे. एम. पटेल महाविद्यालय,भंडारा येथील सभागृहात मोठ्या हर्षोल्हासात पार पडली .

अभिजात मराठी भाषा गौरव दिन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ प्राध्यापक, श्री. केशव कापगते,साकोली यांनी भुषविले, तर उद्घाटक प्राचार्य
डॉ सुधीर मोते भद्रावती, प्रमुख अतिथी म्हणून डॉ विठ्ठल चौथाले गडचिरोली, डॉ. शालिनी तेलरांधे, नागपूर प्रा. उमेश सिंगनजुडे, लाखनी, प्राचार्य सुधाकर देशमुख, माध्यमिक मराठी विषय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मा. घनश्याम पटले गोंदिया यांनी भूषविले.

अभिजात मराठी भाषा गौरव दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रमाचे उदघाटकीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुधीर मोते भद्रावती म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मराठी भाषा चुकीची बोलू नये, तसेच मोठे व्यक्ती सुद्धा मराठी भाषा बोलत असताना चुकत असतील तर त्यांच्या चुका लक्षात आणून द्याव्यात. शिक्षकांनी तर याबद्दल काटेकोरपणे नियम पाळावेत. नंतर प्रा. उमेश सिंगनजुडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पुढील व्यवसायाच्या दृष्टीने कला शाखा निवडावी कारण, जे काही प्रशासनात अधिकारी झालेले आहेत, ते जास्तीत जास्त प्रमाणात कला शाखेतूनच समोर आलेले आहेत असे मत व्यक्त केले.

मार्गदर्शक प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले यांनी, मराठी विषयाच्या शिक्षकाने कोणताही न्यूनगंड न बाळगता, एखादा विषय कठीण असल्यास त्याला सोपा करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे तसेच शेवटच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला विषय कसा पोहोचेल यावर जास्त भर द्यावा, असे मत व्यक्त केले. इयत्ता १२ वी ला फेब्रुवारी/ मार्च २०२६ च्या परीक्षेत भंडारा जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांनी मराठी विषयात ९० गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले. त्या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षक असोसिएश, भंडारा ने सत्कारासाठी पाचारण केले होते. यावेळी जिल्ह्यातील जवळपास ३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ते विद्यार्थ्यी पालकांसमवेत कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी, तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगते थोडक्यात मांडली. सेवानिवृत्त शिक्षक प्रा.अंकुश तितीरमारे यांच्यासह प्रा. ओमप्रकाश ढोरे अमरावती, प्रा. यशवंत पवार दारव्हा, प्रा. अरुण मेश्राम, अमरावती , प्रा. जितेंद्र कुनघाडकर, प्रा. किशोर वावरे, चामोर्शी, प्रा. चेतन नाकाडे, वडसा, प्रा. ज्ञानेश्वर धकाते गडचिरोली यांचेही सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. संजय लेनगुरे यांनी संघटनेची भूमिका, संघटनेचा उद्देश स्पष्ट करून, संघटनेने आजपर्यंत केलेले कार्य नमूद केले. तसेच संघटना ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील दुवा आहे, हे पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र टिचकुले यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. रेखा तितीरमारे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. प्रवीण वंजारी, प्रा. प्रियंका बोपचे, प्रा. ईश्वरकर, प्रा. दुर्गेश वंजारी, प्रा. गायधने, प्रा. दरवळकर, प्रा. करंबे, प्रा. झंजाळ, प्रा. अस्मिता बोरकर, प्राचार्य उत्तम मेंढे, प्रा. सोनुने, प्रा. कापगते, प्रा. कु्रंजेकर प्रा. करचाल, प्रा. हुमे, प्रा. मस्के, प्रा. रामटेके, प्रा. प्रधान, प्रा. कांबळे, प्रा. कोळी, प्रा. तिडके, प्रा. मांदाडे, प्रा. झलके, प्रा. पचारे, प्रा. जांगळे, प्रा. शेंडे, प्रा. सांगोळे प्रा. सेलोकर, प्रा. मढवई, प्रा. पारधी, प्रा. वाघमारे, प्रा. वाकोडे, प्रा. जांभुळकर यांच्यासह मराठी विषय शिक्षक असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!