साहित्यिकांच्या लेखणीचा सन्मान…..
गडचिरोली
नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली च्या वतीने आयोजीत 'महामृत्युंजय वाड्.मय स्पर्धा- २०२५-२६ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. स्पर्धा राज्यस्तरीय असली तरी देश विदेशातून साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता. त्यात परिक्षकांनी खालील विविध प्रकारच्या ४० साहित्यांची निवड केली आहे. विशेष म्हणजे विदेशातील सिंगापूर आणि नेदरलॅंड च्या दोन मराठी साहित्यिकांना पुरस्कृतही करण्यात आले आहे. विविध साहित्य प्रकारातील उत्कृष्ट साहित्य कृतीला नाट्य श्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीनेराज्यस्तरीयमहामृत्युंजयवाङ्मय पुरस्कार 20 डिसेंबरला प्रदान करण्यात येणार आहे. राज्यातील अनेक लेखकांच्या साहित्यकृती सोबतच विदेशातील लेखकांच्या साहित्य कृतींचाही समावेश या पुरस्कारात आहे हे या पुरस्काराचे खास वैशिष्ट्य आहे.
१) कादंबरी
१) लालगुंजी – प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर,चंद्रपूर
२) खोल उन्हातली गर्द सावली – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, नांदेड
३) Love is Love कारण जगणं महत्वाचं आहे – आशा नेगी, पिंपरी चिंचवड (पुणे)
२) कथासंग्रह
१) पजाया – डॉ. प्रतिमा इंगोले, पुणे
२) साईड इफेक्ट्स – रामदास खरे, ठाणे
३) टेक ऑफ – मोहना कारखानीस, सिंगापूर
३) कवितासंग्रह
१) आभार वेदनांचे (गझल) – विनायक गणपतराव कुलकर्णी, सांगली
२) आयुष्य :एक युध्द – संजय गोडघाटे, नागपूर
३) मी कविता लिहीन – डॉ. राजेंद्र लीला दुर्योधन मुंडे, वर्धा
४) खोल जाणिवांच्या तळाशी – कविता झुंजारराव, दहिसर, मुंबई
५) आयुष्याचा शेला विणला – डॉ. मानसी सगदेव मोहरील, द हेज (द नेदरलॅंड)
६) शापीत शृंखला – सौ. छाया बोरकर, अर्जुनी मो.(गोंदिया)
४) समीक्षाग्रंथ/संपादन/संशोधन
१) चांदा ते बांदा – श्री बबन शिंदे, कळमनुरी (हिंगोली)
२) सीमांच्या पलीकडचे – सौ. नेहा भांडारकर, नागपूर
५) नाटक/ एकांकिका/नाट्यविषयक ग्रंथ
१) मोरु द सोल्युशन – राजीव माधव जोशी, दहिसर (मुंबई)
२) अभिनय कला दर्पण – शिवाजी देशमुख, वारंजे (पुणे)
३) नाट्यमधुरा- दत्तप्रसाद जोग, गोवा
६) चरित्रग्रंथ/ आत्मचरित्र/ आत्मकथन
१) वसुधा – प्रा. नवनीत देशमुख, अमरावती
२) झाडं लावणारा मुलगा – प्रियांका कर्णिक, पुणे
३) राजतपस्वी भारतरत्न अटल बिहारी बाजपेयी – डॉ. लक्ष्मण माधवराव शिवनेकर, पुणे
४) क्षितीजगामी – नीता चापले, एरोली (मुंबई)
७) ललीत/ वैचारिक/प्रवासवर्णन
१) काही कडू काही गोड- डॉ. अशोक काळे, नागपूर
२) माझी रेलगाथा – अनिल पाटील, पुणे
३) आदिवासी संस्कृती जीवन आणि आदिम धर्माची चळवळ – श्री. शेषराव मडावी, गडचिरोली
४) मध्यरात्री सुर्य पाहिलेला देश – डॉ. विजयालक्ष्मी विजय देवगोजी, लांजा (रत्नागिरी)
५) नवराष्ट्रातील भटकंती – श्रीकांत पवनीकर, नागपूर
८) बालसाहित्य –
१) बिब्ली ओबिबुलाचा सापळा- सुरेश वांदिले, मुंबई
२) मुले छोटी, स्वप्ने मोठी – प्रा. शिवाजीराव बागल, वाडीकुरोली (पंढरपूर)
३) रंजक नाट्यछटा- डॉ. श्रीकांत पाटील, कोल्हापूर
९)संकिर्ण- शोधप्रबंध /अनुवाद / इतर
१) संजोरी – प्रा. डॉ. धनराज खानोरकर ब्रम्हपुरी (चंद्रपूर)
२) ग्रामगितेतील क्रांतिदर्शीत्व – ज्ञानेश दयारामजी हटवार, भद्रावती (चंद्रपूर)
३) झुंज कॅन्सरशी – जयराम धोंगडे, नांदेड
४) रानभाज्यांच्या जगात – सौ. संगीता संतोष ठलाल, कुरखेडा) (गडचिरोली)
१०.विशेष उल्लेखनीय पुरस्कार –
१) तुटला तारा प्रणयाचा – सिध्दार्थ गोवर्धन (गडचिरोली)
२) तरंग – अहिंसक दहिवले, गडचिरोली
३) काव्य सरिता – राजेंद्र यादवराव सोनटक्के, गडचिरोली
४) भारत अमुचा महान, थोर नारी रत्नांची खाण- पी. डी. काटकर ‘माणिकपुत्र’, जनकापूर (चंद्रपूर)
५) विचारांच्या पलिकडे – अशोक कांबळे, नागपूर
६) गोंडी संस्कृतीची वास्तविकता – नंदकिशोर नैताम, कुरखेडा (गडचिरोली)
७) स्पर्शिका – सुदर्शन सीताराम पनतोडे, नागपूर इत्यादी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून २० डिसेंबरला जि.म. सह. बॅंक, गडचिरोलीच्या सभागृहात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या साहित्यिकांना मान्यवरांचे हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. असे या पुरस्काराचे आयोजक चुडाराम बल्लारपूरे गडचिरोली यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे
०००






