गदर: एक प्रेमकथा हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला त्या काळी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. गदर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटाचा दुसरा भाग गदर 2 लवकरच प्रदर्शित होणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 1970 मधील भारत- पाकिस्तानच्या युद्धावर आधारित हा सिनेमा असणार आहे.
या ट्रेलरची सुरुवात व्हॉईस-ओव्हरने होते. ज्यामध्ये एक महिला ‘दामाद है पाकिस्तान का’असं ती म्हणते. 1971 चा काळ सांगताना ती म्हणते की, तिला नारळ दे, टिकली लाव. अन्यथा यावेळी तो तिला हुंड्यात लाहोरला घेऊन जाईल. ’गदर 2’ चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. गदर 2 चं शूटिंग अहमदनगर, लखनऊ, पालमपूर या शहरांमध्ये झालं आहे. लखनऊतील मार्टिनीरी महाविद्यालयात पाकिस्तानच्या दृश्याचं चित्रीकरण केले आहे. तसेच इंदौर, मध्यप्रदेश आणि मांडू्मध्ये देखील गदर 2 चं शूटिंग झालं आहे. या सिनेमात तारा सिंह आणि त्याचा मुलगा चरणजीत यांच्या नात्यावर आधारलेला आहे. उत्कर्ष शर्मा हा मुलगा चरणजीतच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा केव्हा प्रेक्षकांना पहायला मिळते याची उत्सुकता लागली आहे






