– एका दैनिकात काम करणारे उपनगर पत्रकारांवर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर जीवघेणे हल्ले सातत्याने सुरू आहेत. ही लोकशाहीला मारक असली बाब आहे. अशातच पुणे येथे एका तरुण पत्रकारावर बंदुकीने हल्ला चढवला.
रविवारी रात्री पत्रकार 34 वर्षीय हर्षद कटारिया हे महर्षिनगर परिसरातून घरी जात होते, सोसायटी जवळ पोहचताच दुचाकीवर आलेल्या २ अज्ञातांनी हर्षद वर मिरची पूड टाकीत गोळीबार केला , मात्र ऐनवेळी ते वाकल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला.
याआधी सुद्धा हर्षद वर असे जीवघेणे हल्ले झाले होते, पत्रकारितेसह त्यांनी माहिती अधिकार अंतर्गत अवैध इमारतीवर बुलडोजर चालविण्याचे काम सुद्धा केले आहे.
याबाबत हर्षद यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन अज्ञात हल्लेखोर कैद झाले आहे. या घटनेचा पुरोगामी पत्रकार संघ निषेध करत आहे व दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आहे.






