प्रहार जनशक्ती पक्ष शेगाव तर्फे ग्रामपंचायत शेगाव यांना निवेदन
दिव्यांग बांधवांचा ५% राखीव निधी हा वार्षिक उत्पनातून सरसकट देण्यात यावा व जेवढ्या दिव्यांग बांधवांचे अर्ज येईल तेवढ्याना वाटप करन्यात यावा या साठी प्रहार जनशक्ती पक्ष शेगाव यांचे कडून ग्रामपंचायत सेवा बुद्रुक यांना निवेदन देण्यात आले
दिव्यांग बांधवाना शासन निर्णयानुसार ग्राम पंचायतीच्या वार्षिक उत्पनातून राखीव ५% निधी देण्यात येतो मात्र काही वर्षात वार्षिक उत्प्नापैकी काही निधी हा इतरत्र खर्च केला जातो व उर्वरित उत्प्नांतून ५% निधी दिला जात होता मात्र शासन निर्णयात सरसकट ५% निधी देण्याचे आदेश असून सुद्धा दिव्यांग बांधवांचा राखीव ५% निधी हा वार्षिक उत्पनांतून सरसकट देण्यात यावा. दिव्यांग बांधवांचे येणारे सर्व अर्ज नियमानुसार छाननी करून संपूर्ण लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात यावा कारण मागील काही वर्षात हा निधी वाटपात घोळ झाला होता असे या निवेदनात म्हंटले आहे. तसेच काही जणांना दर वर्षी निधी देण्यात आला तर काही जणांना अद्यापही निधी मिळालेला नाही. त्यामुळे कोणताही लाभार्थी ५% निधी पासून वंचित राहणार नाही याची खबरदारी ग्रामपंचायतने घ्यावी अन्यथा दिव्यांगाना घेऊन प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे शेगाव बू येथे आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे.






