spot_img
spot_img
7.3 C
New York
Saturday, November 28, 2026

शेगाव बुज प्रशासकाच्या चा अजब कारभार

गावातील खड्डे बुजवण्यासाठी चुरी, मुरुमा ऐवजी चक्क मातीचा वापर…

वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथे दरवर्षी मस्कऱ्या गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या प्रमाणात उत्साहात काढल्या जाते हे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहुन भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात, दरवर्षी गणपती मंडळाचे स्वागत करण्यासाठी विविध राजकीय पक्षाकडून मंडप टाकण्यात येते तसेच काही सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी मंडळीकडून याठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जाते तसेच शेगाव येथील जमा मज्जित कमिटी कडून सुद्धा गणपती मंडळाचे उत्साहान स्वागत केले जाते.

याच पार्श्वभूमीवर शेगाव बु. येथील मुख्य रस्ता व आष्टा बायपास येथून सर्व गणपतीची मिरवणूक निघत असताना या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठे खड्डे बुजवण्यासाठी शेगाव प्रशासक यांनी चुरी,मुरमा ऐवजी चक्क मातीचा वापर केलेला आहे.

सुरू असलेल्या सणासुदीच्या काळात तसेच समोर येणाऱ्या नवरात्र, दसरा, दिवाळी या सारख्या सणामध्ये कदाचित या मातीवर पाऊस पडला किंवा पाणी साचले तर चिखल तयार होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शेगाव बु. प्रशासकाला हा शहाणपणा सुचला कुठून असा प्रश्न गावातील सुज्ञ नागरीक यांचेकडून उपस्थित करण्यात येत आहे..

या बद्दल गावातील नागरिक विनोद राऊत यांनी शेगाव बु. ग्रामपंचायत मध्ये प्रशासक म्हणून असलेले ग्रामसेवक मुकाडे यांना फोन करून विचारणा केली असता आमच्याकडे निधीच उपलब्ध नाही त्यामुळे आम्ही चुरी, मुरमा ऐवजी मातीचा वापर केला असे त्यांनी सांगितले…

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!