spot_img
spot_img
8.3 C
New York
Sunday, November 29, 2026

सयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक सुरेश गरमडे राज्यात प्रथम

जवस उत्पादन स्पर्धेत राज्यातून प्रथम येण्याचा मान

या आधी हरभरा पीक स्पर्धेत सुद्धा जिल्ह्यातून प्रथम येण्याचा पटकाविला होता मान


शेगाव बु. येथील सयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेगाव बु. परिसरातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र कृषी विभाग आत्मा चंद्रपूर अंतर्गत महाबीज कंपनीचे LSL – 93 या वाणाचे जवस वाटप करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्र कृषी विभाग मार्फत रब्बी हंगाम 2025 च्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेत काही शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. या पीक स्पर्धेत सुरेश बापूराव गरमडे यांनी जवस या पिकांमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक पटकवला त्याबद्दल शेगाव बु. परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्यस्तरीय पीक स्पर्धेत जवस या पिकांमध्ये राज्यातून प्रथम क्रमांक आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये यावर्षी जवस लागवडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आत्मा चंद्रपूर अंतर्गत यावर्षी संयुक्त ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून LSL – 93 या जातीच्या जवसाचे बीज उत्पादन चे प्लॉट्स मोठया प्रमाणात हाती घेतले आहे. मागील वर्षी या योजनेतून शेतकऱ्यांना जवसाचे उत्पादन चांगल्या प्रकारे होऊन त्यांना 9651 ₹ प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावन्यास हातभार झाला होता. शेतकऱ्यांनी याबद्दल प्रकल्प संचालक आत्मा यांचे आभार मानले असुन महाराष्ट्र राज्यातून जवस या पिकांमध्ये प्रथम क्रमांक घेणारे सुरेश बापूराव गरमडे यांनी शेतकऱ्यांना जवस लागवड करण्याचे आवाहन केले आहे. सुरेश गरमडे यांनी हरबरा या पिकांमध्ये सुद्धा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला होता हे विशेष गरमडे यांनी यासाठी मा. प्रकल्प संचालक अरुण कुसळकर चंद्रपूर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल घागी, तालुका कृषी अधिकारी रवी राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिनखेडे, शेगाव बु. मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, सयुक्त ऍग्रो एफ. पी. सी. एल. चे अध्यक्ष विनोद राऊत, संचालक विनोद कोटकर, व इतर सर्व संचालक व कृषी विभागाचे कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!