संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष…
शेगाव बु येथे दिवाळी निम्मित फटाखे दुकानं मोठी प्रमाणत ठिकठिकाणी सजलेली असून गावातच मुख्य बाजारपेठेत रस्त्यालगत तसेच घरातीलच गोडाऊन मद्ये अरुंद गल्ली मद्ये, धार्मिक स्थला जवल मोठ्या प्रमाणात लाखो रुपये किमतीची फटाखे यांचा साठा करून कोणत्याही फायर अवरोधक साहित्य नसताना खुलेआम दुकानं सजवलेली आहे. मुख्य म्हणजे फटाखा सारख्या स्पोटक वस्तू विक्री परवानगी देताना त्या खुल्या पटांगणात लावणे व सोबतच अग्निशामक यंत्र असणे अत्यावश्यक असताना या कडे दुर्लक्ष होत असून प्रशासक यांनी मुख्य बजापेठेतच फटखा विक्री साठी परवानगी दिली कशी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शेगाव येथे ज्या ज्या ठिकाणी हे फटाका विक्री सुरू त्या ठिकाणी कपडा, किराणा, ज्वेलरी, हार्डवेयर दुकाने व बँक, आणि मोठ्या प्रमाणात नगरी वसाहत असलेल्या निवासी आणि वरदळीच्या ठिकाणी दुकानं मोठ्या प्रमाणात असून सणासुदीचा काळा मुळे व शेगाव बु हे गाव 50/53 खेड्यांची बाजारपेठ असल्या कारणांनी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. फटका दुकानं मद्ये कदाचित एखादी दुर्घटना झाली तर याची जवाबदारी घेणार कोण? असा प्रश्न आता जागरूक नागरीक यांनी केला आहे.






