जुन्नर
दिनांक २८,२९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला. कबड्डी संघ पुढीलप्रमाणे रुद्र सांगडे, ओमकार खिलारी, पियुष गायकवाड, अविष्कार दातखिळे, ओंकार खिल्लारी, आलाप साळुंके, पार्थ शिंदे, शिवम साळुंके, सोहम डांगले, तुषार मडके, यश गिधे, समीर तुरे या खेळाडूचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना प्रा मयुर बोंबले यांनी मार्गदर्शन केले.
हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जुन्नर तालुक्याचे नेतृत्व करणार अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी वाघमारे यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजयराव शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा व्ही बी कुलकर्णी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ आर.डी चौधरी, उपप्राचार्या व समन्वयक प्रा पी एस लोढा, पर्यवेक्षक प्रा एस ए श्रीमंते, एम सी व्ही सी विभाग प्रमुख प्रा के जी नेटके, वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना विभाग प्रमुख प्रा ए के बढे, विविध विभागांचे प्रमुख व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गानेही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.






