spot_img
spot_img
23.1 C
New York
Saturday, June 6, 2026

जागतिक योगासन स्पर्धेत भद्रावतीची डॉ पुजा देऊरकर सुवर्ण पदकाने सन्मानित…

जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून अव्वल स्थानी…

भद्रावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा….

भद्रावती

जागतिक योगासन स्पर्धेत भद्रावतीची योगशिक्षिका डॉ पूजाताई देऊरकर यांनी आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून भारत देशाची मान उंचावली.

भद्रावती येथील योग शिक्षिका डॉ पुजा देऊरकर हिने जागतिक योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले व देशाला सुवर्णपदक मिळवून देऊन देशाची मान उंचावली. आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी आणि परिश्रमाच्या आधारावर तिने हे दैदिप्यमान यश संपादन करून सुवर्ण कामगिरी केली.

देशाची मान उंचावणारी कामगिरी


चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली या गावातील पूजा देऊरकर या युवतीने आकाशाला गवसणी घालत योगासन क्रिडा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील कामगिरीत अव्वल स्थान पटकावून भारत देशाचे नाव चमकविल्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. डॉ पूजा देऊरकर यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच. बालपणापासून अस्थमा आजार ते अपेंडिक्स शस्त्रक्रिया यामुळे लिक्वीड आहार असा प्रतिकूल संघर्ष करीत डॉ.पूजा ने योगासन या क्रीडा क्षेत्रात सातत्याने चमकदार कामगिरी केली. या आधी सुद्धा विविध योगा स्पर्धेत जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवर अनेक पुरस्कार पूजाने प्राप्त केले आहेत.


गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत ३५ ते ४५ वयोगटात अव्वल स्थानावर झेप घेत डॉ. पूजा देऊरकर ने देशाची मान उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल संपूर्ण देशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जागतिक स्पर्धेस रवाना होत असताना सर्वप्रथम अपडेट इंडिया टीव्ही न्यूज चॅनल ने दखल घेत शुभेच्छा दिल्या होत्या. डॉ. पूजा च्या दैदिप्यमान अश्या जागतिक स्तरावरील अव्वल कामगिरीने समस्त भद्रावती करांची मान अभिमानाने उंचावली असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!