भद्रावती :
जागतिक योग स्पर्धा २०२६ मधील सुवर्णपदक प्राप्त भद्रावतीच्या सुवर्णकन्या डॉ. पूजा देऊरकर यांच्या विजय मिरवणुकीचे भद्रावतीत आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ११ जुन रोजी संध्याकाळी ४.०० वाजता डॉ पुजा देऊरकर यांची बाळासाहेब ठाकरे गेट येथुन विजयी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक योग स्पर्धेत भारताचे नेतृत्व करून सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या सुवर्णकन्येची भद्रावती येथील ठाकरे गेट ते नाग मंदीर पर्यंत ही विजयी मिरवणूक निघणार आहे . भद्रावतीच्या इतिहासातील सुवर्ण अक्षरांनी नोंदवलेल्या या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भद्रावतीच्या सर्व नागरीकांनी तसेच इतर सामाजिक संस्थानी या मिरवणुकीत स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे. जागतिक योग स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील सुवर्णकन्या डॉ. पूजा देऊळकर यांनी अलैकिक नेत्रदीपक कामगिरी केली, यांचे भद्रावतीत भव्यदिव्य स्वागत करण्यासाठी व विजयी मिरवणूकीत मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन मिरवणुकीचे आयोजक श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिर समिती, भद्रावती व श्री गुरुदेव सेवा मंडळ, भद्रावती यांचे वतीने करण्यात आले आहे.






