शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील साखरा शेत शिवारात घेतला
गळफास
शेगाव… शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा वडगाव शेत परिसरात एका निंबाचा झाडाला विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या साखरा वडगाव शेत शिवारात दुपारचा सुमारास लिंबाच्या झाडाला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत विवाहित महिलेचे प्रेत परिसरात काम करत असलेल्या शेतकऱ्यांना आढळून आले. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली.
घटनेची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आल्या नतर पोलिसांनी घटनास्थळ पोहचून पंचनामा करत मृतदेह उत्तरणी तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा या ठिकाणी पाठवण्यात आले. दरम्यान मृतक महिला हीची ओळख होत नसल्याने शेगाव पोलीस यांनी वेगानी चक्र फिरवत गिरड पोलीस यांच्याशी संपर्क करून मृतक महिलेची ओळख पटवली.
गळफास घेतलेले महिलेचे नाव मयुरी हरीदास सुपारे असे असून वय वर्ष 27 वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील खेक येथील असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. दरम्यान घटनेचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनास पि. एस. आई. कांबळे व शेगाव पोलीस करीत आहे..






