लेखन प्रेरणा दिन संपन्न…
भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी हा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. किशोर ढोक, प्रमुख अतिथी प्रा. उज्ज्वला वानखेडे, प्रा. संगिता जक्कूलवार, प्रा. वर्षा दोडके, प्रा. प्रविण मत्ते हे व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला मल्यार्पण व प्रतिमा पूजन करून करण्यात आली.

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्रा किशोर ढोक यांनी महापुरुषांचे विचार आपल्या जीवनात अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी प्रा उज्वला वानखेडे, प्रा. संगीता जक्कूलवार, प्रा. वर्षा दोडके , प्रा. प्रवीण मते सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वर्ग अकरावीची विद्यार्थिनी आस्था मरस्कोल्हे हिने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. लेखन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात महाविद्यालयात घेतल्या गेलेल्या ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वर्ग १२ विद्यार्थिनी कल्याणी सेलोकर हिने केले, तर आभार प्रदर्शन वर्ग ११ ची विद्यार्थिनी नंदिनी वर्मा हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, प्रा. हरिहर मोहरकर, प्रा. प्रणिता बोकडे , कवडू पोलेवार, प्रविण सोनवणे यांनी परिश्रम घेतले.






