भद्रावतीतील जनता भयभीत….
भद्रावती
भद्रावती शहर हे औद्योगिक शहर आहे. तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या प्रगत शहर आहे. हे शहर जंगल परिसराला लागून असल्याने भद्रावती शहरात चक्क वाघ येत आहे. भद्रावती शहरात बरेचदा वाघ शहरात आल्याने त्याला पकडण्याच्या बातम्या कायमच्या झालेल्या आहेत. नुकतीच भद्रावती शहरात वाघ पकडण्याची बातमी ताजी असतानाच आज पुन्हा भद्रावतीत भंगारात वार्ड परिसरात चक्क वाघाने दर्शन दिल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भद्रावती शहरात नेहमीच अनेक भागात वाघ येत आहे. आज भंगाराम वार्ड परिसरामध्ये शाळकरी मुलांना वाघ दिसला. वाघ शहरात आल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. त्या भागात वाघ फिरण्याची बातमी वन विभागाला कळविण्यात आली. भद्रावती शहरातील ग्रामोद्योग संघाच्या मागच्या भागात पद्मावार वाडीच्या परिसरात वन विभागाने पिंजरा मांडून परिश्रमाने वाघाला पकडण्यात यश संपादन केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वारंवार भद्रावती शहरात सतत वाघ येत असल्याने भद्रावती शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वन विभागाच्या वतीने वाघ शहरात येणार नाही या साठी कायम स्वरुपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे.






