spot_img
spot_img
20.9 C
New York
Wednesday, July 29, 2026

विदर्भ स्तरीय वरिष्ठ महिला पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाच्या झरणा बेहरा हिचे सुवर्ण यश

भद्रावती : दिनांक २५ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित विदर्भ स्तरीय सीनियर महिला पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय, भद्रावतीची खेळाडू कु. झरणा बेहरा (इयत्ता ११ वी विज्ञान) हिने ५७ किलो वजन गटात एकूण २६५ किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकाविला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिने संपूर्ण विदर्भात विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती तसेच भद्रावती शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाचे श्रेय झरणा बेहरा हिने आई श्रीमती सीमा बेहरा, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संगीता आर. बांबोडे तसेच क्रीडा प्रशिक्षक अमोल आवळे यांना दिले.

झरणाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष, पुरुषोत्तम स्वान, उपाध्यक्ष, जयंतराव टेमुर्डे, सचिव अमन टेमुर्डे, सहसचिव राजेंद्र गावंडे, कोषाध्यक्ष अभिजीत बोथले तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, डॉ. आस्टूनकर, डॉ. घुमे, डॉ. खामणकर, डॉ. तेलंग, प्रा. कापगते, प्रा. दाते, प्रा. बैराम यांच्यासह सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी झरणा बेहरा हिचे अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!