spot_img
spot_img
32.4 C
New York
Friday, June 5, 2026

मराठी विषयात ९७ गुण घेऊन नागपूर विभागात विभागात प्रथम आलेल्या लिशिका बनाईतचा घरी जाऊन सत्कार….

मराठीचा झेंडा डौलाने फडकला….

मराठी महासंघाच्या वतीने घरी जाऊन अभिनंदन……

नागपूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात एच एस सी परीक्षेच्या निकालात विभागीय शिक्षण मंडळ नागपूर मधून मराठी या विषयात ९७ गुण प्राप्त करून कु. लिशिका हिम्मतराव बनाईत ही विद्यार्थिनी नागपूर विभागातून मराठी विषयात प्रथम आली. तिच्या घरी जाऊन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विभागीय शिक्षण मंडळ पुणे मार्फत जाहीर झालेल्या एचएससीच्या निकालात नागपूर विभागीय शिक्षण मंडळ नागपूर येथून मराठी या विषयात ९७ गुण घेऊन कुमारी लिशिका हिम्मतराव बनाईत विद्यार्थिनी प्रथम आली. ही सेंट पाॅल जुनिअर कॉलेज चिकना, पिपळा रोड, हुडकेश्वर, नागपूर या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला प्राध्यापिका पुष्पा राऊत यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. अभ्यासातील सातत्य राखत चिकाटी , जिद्दीने, मेहनतीने तिने हे यश संपादन केले आहे. मराठी हा विषय तिच्या आवडीचा विषय असल्याने, तिची या विषयात विशेष रुची होती. तिने या विषयात ९७ गुण घेऊन विभागीय शिक्षण मंडळ नागपूर विभागातून मराठी विषयात प्रथम क्रमांक पटकाविला. आवांतर वाचनाची आवड हा तिचा छंद असल्याने तिने हे यश संपादन केले.

तिने प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचे, तिच्या आई-वडिलांचे त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. मराठी विषय महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर शालिनी तेलरांधे , नागपूर जिल्हा पदाधिकारी प्रा. किशोर वरभे, सौ. निता वरभे मॅडम, प्रा. आरती विंचूरकर, प्रा. प्रिया डेंगळे, आदी पदाधिकारी यांनी तिचे व पालकांचे सत्कार व अभिनंदन केले. तिच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली व तब्येतीची काळजी घ्यावी असे सांगितले.

मराठी विषय शिक्षक महासंघाचे संस्थापक सचिव प्रा. बाळासाहेब माने मुंबई , व मराठी विषयाचे नागपूर विभागाचे मुख्य नियामक प्राध्यापक पवन कटरे यांनी भ्रमणध्वरीद्वारे कु. लिशिकाशी संवाद साधला, अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लिशिकाची मुलाखत प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी घेतली. यात तिने अभ्यासाचे रहस्य उलगडून सांगितले. व मराठी विषयाची भीती न बाळगता सर्वांनी मराठी विषय घ्यावा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्याध्यक्ष प्रा संपतराव गर्जे अहमदनगर, कोषाध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे भंडारा, प्रा. डॉ. दिलीप जाधव सांगली, समन्वयक प्रा. डॉ. पांडुरंग कंद पुणे, सहसचिव प्रा. डॉ. स्मिता भुसे नगर, उपाध्यक्ष प्रा. डॉ प्रतिभा बिश्वास मुंबई, सल्लागार प्रा. संजय पाटील, प्रा. डॉ. अंजना खताळ, प्रा.डॉ. विजय हेलवटे, प्रा. अंकुश प्रकाश, प्रा. सुधाकर ठाकूर जळगाव, प्रा. यशवंत पवार, प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले, प्रा. मेघा राऊत, प्रा. डॉ. माया रंभाळे, प्रा. अमित गायधने, प्रा. किंमतकर मॅडम , प्राचार्या विजया मने, प्रा. नामदेव मोरे, प्राचार्य डॉ सुधीर मोते प्रा. जितेंद्र टिचकुले, प्रा. गंगाधर कुनघाटकर तसेच मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य तथा नागपूर विभागातील मराठी विषय शिक्षक महासंघाचे पदाधिकारी यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. मराठी विषयात नागपूर विभागातून सर्वाधिक गुण घेतल्यामुळे सर्वस्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यात मराठी विषय शिक्षकांनी आपल्या विषयात प्रथम आलेल्य विद्यार्थ्यांची नोंद घेतली व अशाप्रकारे प्रत्यक्ष घरी येऊन कौतुक केले हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे असे मनोगत प्रा. बनाईत मॅडम यांनी व्यक्त केले. यावेळी तिच्या परिवारात तिची बहीण, आई-वडील व आजोबा हे सुद्धा या अनपेक्षित सत्काराने सुखावले. यासाठी त्यांनी मराठी विषय शिक्षक महासंघाचे व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!