भद्रावती : नुकत्याच जाहिर झालेल्या माध्यमिक बोर्ड दहावीच्या परिक्षेच्या निकालात श्री साई कॉन्व्हेंट भद्रावतीने उत्तम निकालाची परंपरा कायम राखत उत्कृष्ठ निकाल दिला असुन शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक बोर्ड दहाविच्या परिक्षेत श्री साई कॉन्व्हेंट मधून ४१ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यात सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. पलक सतीश गोवारदिपे या विद्यार्थीनिने ९५.८० टक्के गुण प्राप्त करून श्री साई कॉन्व्हेंट मधून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला. नैतीक दिलीप कपाट या विद्यार्थ्याने ९५.४० टक्के गुण घेवून व्दितीय आला. कु स्मृती संजय कांबळे ९२.४० टक्के गुण प्राप्त करून तृतीय आली आहे. कु. श्रावणी सावरकर हिला ९० टक्के गुण, कु. श्रावणी सातघरे हिला ८९.६० टक्के गुण प्राप्त झाले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका कु. किरण कोथळे, मुख्याध्यापक अतुल बडकेलवार, शिक्षक वृंद तथा आईवडिल यांना दिले आहे.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कांताताई गुंडावार, सचिव प्राध्यापक अतुल गुंडावार, रूपा गुंडावार यांनी सर्व गुवणंत विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.






