भद्रावती
भद्रावती शहरात विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेस ची सोय व्हावी या उद्देशाने प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांनी स्काॅय एज्युकेशन अकॅडमी स्थापन केली. स्काॅय अकॅडमी मध्ये जेइइ, नीट, सीइटी अशा परीक्षेचे कोचिंग केले जाते. सोबतच बारावीच्या विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डची सुद्धा तयारी करून घेतली जाते.
स्काॅय अकॅडमी भद्रावती चा निकाल हा शंभर टक्के असून अंजली नागोसे 91.17 टक्के गुण घेऊन भद्रावती तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे तर विक्रमजीत शिंदे यांने 87.83 टक्के गुण घेऊन भद्रावती तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. सोबतच मृणांक जगदीश लखावार 85.33% गुण प्राप्त केले. शिरीष रवींद्र उताने याने 82.83% गुण प्राप्त केले. उन्नती किशोर जट्टलवार यांनी 82 टक्के गुण प्राप्त केले . स्काॅय अकॅडमी चे संचालक डॉ कार्तिक शिंदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
भद्रावती शहरात व तालुक्यात विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय होऊ नये, त्यांना गावातच या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे, तयारी केली जावी या हेतूने आमची विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देणारी स्काॅय अकॅडमी आहे. तिचा निकाल शंभर टक्के आहे व मागील वर्षे सुद्धा तालुक्यातून प्रथम विद्यार्थी देण्याचा मान स्काॅय अकॅडमीने प्राप्त केला होता हे विशेष. स्काॅय अकॅडमी मधून ज्यांनी गुणवत्ता प्राप्त केलेली आहे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संचालक डॉ कार्तिक शिंदे यांनी केला.






