अंजली नागोसे 91.17% गुण घेऊन तालुक्यातून द्वितीय तर विक्रमजीत शिंदे तालुक्यात तृतीय
भद्रावती
नुकताच एच एस सी चा निकाल जाहीर झाला. या निकालात भद्रावती तालुक्यात उत्तम निकालाची परंपरा कायम राखत यशवंतराव शिंदे यांनी कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती हे तालुक्यातून अव्वल ठरलेले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती घवघवीत यश संपादन केले आहे.
यात विज्ञान शाखेची विद्यार्थिनी तनुजा नागोसे 91.17% गुण घेऊन भद्रावती तालुक्यातून द्वितीय व महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला आहे .तर याच महाविद्यालयातील विक्रमजीत शिंदे 87.83 गुण घेऊन तालुक्यातून तृतीय व महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याच महाविद्यालयातील मृणाल लक्कावार याने 85.33 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

वाणिज्य शाखेत सुद्धा विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले असून तालुक्यातून प्रथम क्रमांक येण्याचा मान जानू राऊत हीने 75 टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तालुका द्वितीय क्रमांक शरण्या आष्टूनकर 70 टक्के हिने प्राप्त केला असून तालुक्यातून तृतीय क्रमांक तृप्ती दुबे 67 टक्के हिने प्राप्त केला. यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेचा निकाल सुद्धा उत्तम लागला असून तो धनश्री पारखी हिने 69 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला, तर समीक्षा ढोके हिने 57% गुण घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
यशवंतराव शिंदे विद्यालय हे शिक्षणात अव्वल तर आहेत पण सोबतच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा हे महाविद्यालय राज्यस्तरापर्यंत पोहोचलेले आहे. या महाविद्यालयातील विविध शाखेतील यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, सचिव, प्रा. डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव प्रा. डॉ. विशाल शिंदे, विश्वस्त डॉ जयंत वानखेडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुधीर मोते, समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.






