spot_img
spot_img
32.4 C
New York
Friday, June 5, 2026

चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्यात आणखी एक बळी…

जंगलामध्ये पूजेसाठी गेलेल्या इसमाला वाघाने हल्ला करून केले ठार…

चिमूर तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वहानगाव येथील एक व्यक्ती आपल्या कुलदेवताची पूजा करण्यासाठी गेले असता वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडलेली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय खडसंगी अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक 55 बोथली बीट अंतर्गत दोन बफर मध्ये ही घटना घडली आहे.
आजही आदिवासी समाज नियमित वनदेवतेला पूज्यनीय मानून त्याची पूजा करत आला आहे. यातच चैत्र नवरात्रीपासून ते बुद्ध पौर्णिमा पर्यंत आदिवासी बांधव हे गोंडी देवाची मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना करतात. त्यांचे देव ठिकठिकाणी जंगलालगत मोहाच्या झाडावर बांधलेले असतात त्यातच बुधवारी वाहनगाव येथील शंकर दादाजी मसराम वय वर्ष 48 धंदा मजुरी यांनी नवीन दुचाकी घेतल्यामुळे गावालगत असलेल्या जंगलाच्या आपल्या श्रद्धास्थानी जाऊन पूजा करीत असताना जवळपास दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले‌. यावेळी अधिक वेळ होऊन सुद्धा शंकर मसराम घरी परत न आल्यामुळे घरच्यांना वाटले की शंकर मसराम हे नेरीला राहत असल्यामुळे तिथे गेले असेल परंतु रात्रीपर्यंत ते नेरी ला सुद्धा पोहोचले नसल्यामुळे शुक्रवारी सकाळी घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली त्यानंतर वन विभागाच्या मदतीने जंगलामध्ये शोध घेतले असता परिसरात पूजनाच्या 200 ते 300 मीटर पर्यंत मसराम यांचे प्रेत आढळून आले, घटनेची माहिती प्राप्त होताच शेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी, दाखल होऊन यावेळी शेगाव पोलीस व वन विभागाची कर्मचारी घटनास्थळ पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी चिमुर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले.
यावेळी मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला तात्काळ सहाय्यक वनसंरक्षक दुबे यांच्या उपस्थितीत वनविभागाकडुन पन्नास हजाराची मदत करण्यात आली असून व घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी अधिकारी, राऊत मॅडम, शेगावचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांचे मार्गदर्शनात शेगाव पोलीस,वन अधिकारी करीत आहे….

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!