spot_img
spot_img
20.9 C
New York
Wednesday, July 29, 2026

रोड बांधकाम ठेकेदारच्या चुकीच्या नियोजनाचा प्रवाशांना फटका..

मागील आठवडाभरापासून शेगाव ते चंदनखेडा मुधोली मार्गे बस सेवा बंद..

शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान…

शेगाव बु वरून चंदनखेडा मुधोली मोहरली या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम मागील अनेक दिवसापासून सुरू असून रोड बांधकाम ठेकेदारी चुकीच्या नियोजनाच्या फटका वाहनधारकासहित प्रवाशांना बसत आहे.

या रस्त्याचा ठेका यादव कंट्रक्शन वर्धा यांना मिळाला असून. मागील सहा महिने आधी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, चंद्रपूर वणी, आर्णी क्षेत्राचे खासदार, वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार यांची उपस्थितीत संबंधित रस्त्याची भूमिपूजन थाटामाटात करण्यात आले होते. त्यानंतर सुमारे दोन महिन्यानंतर शेगाव बु -चंदनखेडा, मुधोली,मोहरली या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

परंतु या बांधकाम करणाऱ्या ठेकेदार यांनी एका बाजूने रस्त्याचे बांधकाम करत दुसऱ्या बाजूला वाहतूक सुरळीत ठेवणे अपेक्षित असताना पर्यायी व्यवस्था नसुन ठेकेदार यांनी संपूर्ण रस्ताच खोदून त्यावर मुरूम टाकून काळी गिट्टी पसरवण्यात आली त्यामुळे परिसरात झालेल्या पावसात ठिकठिकाणी वाहने रस्त्यावरून चालताना चिखलामध्ये फसुन, घसरून किरकोळ अपघात होत आहे , तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल पडले असून एक फुटापर्यंत गड्डे पडलेले आहे,या रस्त्या अभावी शेगाव बु मार्गे शेगाव खुर्द चंदनखेडा मुधोली ही बस सेवा मागील आठवडाभरापासून परिवहन विभागाकडून बंद करण्यात आली असून ही बस सेवा शेगाव, आष्टा,मार्गे मुधोली या मार्गे वळवण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार 30 जून पासून संपूर्ण विदर्भामध्ये शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून 30 जून पासून एकदाही बस न गेल्यामुळे मुधोली, काटवल, विलोडा, कोकेवाडा, चंदनखेडा, शेगाव खुर्द,या ठिकाणाहून शेगाव मध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मागील आठवडाभरापासून या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर एका बाजूने वाहतूक सुरळीत कशी करण्यात येईल याकडे लक्ष देऊन पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. तसेच लोकप्रतिनधीं या कडे कधी लक्ष घालतील हाच प्रश्न विद्यार्थी आणि प्रवासी यांना पडला आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!