spot_img
spot_img
7.3 C
New York
Saturday, November 28, 2026

माजी आमदार स्व नीळकंठराव शिंदे साहेबांचे कार्य प्रेरणादायी….

माजी आमदार स्व. नीळकंठराव शिंदे साहेब यांचा ८४ वा जयंती उत्सव थाटात संपन्न..

गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपणासोबत विविध कार्यक्रम..

भद्रावती

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी , भद्रावती येथे दिनांक १ जुलै २०२६ ला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे संस्थापक सचिव, माजी आमदार स्व. नीलकंठराव शिंदे साहेब यांचा ८४ वा जयंती उत्सव विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

भद्रावती चे माजी आमदार तथा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे संस्थापक सचिव स्व. नीळकंठराव शिंदे यांचा ८४ व्या जयंती उत्सवा प्रित्यर्थ यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्व. नीळकंठराव शिंदे साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नव्याने तयार करण्यात आलेले अद्यावत डिजिटल रूमचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयीन वेबसाईटचे लोकार्पण, व्यासपीठ वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रवीण शिंदे सर यांचा सेवापूर्ती सत्कार, तसेच दहावी, बारावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ओपन जिम चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते तसेच सेवानिवृत्त शिक्षकांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्रीमती नीलिमाताई शिंदे यांनी स्वर्गीय नीलकंठराव शिंदे साहेब यांनी भद्रावती परिसरात सर्वसामान्यांना व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दारे उघडून शैक्षणिक क्रांती केल्याचे मनोगत व्यक्त केले. त्यांचे कार्य नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहेत, त्याचा आदर्श जपला पाहिजे असे सांगितले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री प्रवीण शिंदे सर यांनी सेवानिवृत्ती सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती नीलिमाताई शिंदे विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती ह्या होत्या, तर प्रमुख अतिथी डॉ विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, प्रमुख अतिथी प्रा. डॉ कार्तिक शिंदे सचिव, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, डॉ जयंत वानखेडे सदस्य, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती , प्राचार्य डॉक्टर सुधीर मोते हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते .

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे संस्थापक सचिव, माजी आमदार स्वर्गीय नीळकंठराव शिंदे यांची जयंती विविध कार्यक्रमांच्या द्वारे संपन्न झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर सुधीर मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेअंतर्गत सेवानिवृत्त झालेले शिक्षक, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!