भद्रावती
वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २९,३० नोव्हेंबरला विविध कार्यक्रम पर पडले. यातीलच एक महत्त्वाचा कार्यक्रम दिनांक १ डिसेंबर रोज रविवारला रात्रौ ठीक ८.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण मनो विज्ञानावर आधारित डोळ्यावर विश्वास न बसणारा नवनाथ गायकवाड पुणे यांचा संमोहन कार्यक्रम लोकमान्य विद्यालयाचे भव्य प्रांगणात आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजनातून समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती, एकाग्रता , डोकेदुखी, झोपेच्या समस्या, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासनिर्माण करणे, एकाग्रतेचा अभाव दूर करणे, लक्षात राहत नाही , आठवत नाही , परीक्षेचे भीती वाटते, ताप येतो, घाम सुटतो यावर आधारित प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
देश विदेशात २६५० यशस्वी कार्यक्रमानंतर भद्रावती येथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीगुरुदेव सेवा मंडळ भद्रावतीच्या वतीने करण्यात आले आहे.






