spot_img
spot_img
32.4 C
New York
Friday, June 5, 2026

मागील 3 दिवसा पासून शेगाव बु ग्रामपंचायत रामभरोसे

सरपंच विरुद्ध ग्रामपंचायत कर्मचारी वाद पेटला

कर्मचाऱ्यांनी केली पोलीस स्टेशन येथे सरपंच विरोधात एफ. आई.आर. दाखल..

वरोरा तालुक्यातील शेगाव बुद्रुक हे ग्रामपंचायत नेहमीच वादग्रस्त ठरत आली आहे. कुठल्या ना कुठल्या कारणास्तव नियमित वादात सापडलेली असते या आधी सुद्धा या ग्रामपंचाच्या कार्यप्रणालीवर भ्रष्टाचाराचे फार मोठे आरोप झालेला आहे. परंतु या वेळेला खुद्द ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सरपंच विरोधात मनमानी कारभार, शिवीगाळ करणे, धमकी देऊन कामावरू काढून टाकतो व आर्थिक गैरव्यवर केल्याप्रकरणी एफ आय आर दाखल केली आहे.
सविस्तर असे की ग्रामपंचायत कर्मचारी विजय बावणे हे मागील 10 वर्ष पासून शेगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत मध्ये कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून आहे शेगाव येथील सरपंच हे नेहमीच कर्मचाऱ्यांसोबत उद्धटपणे वागतात असे त्यांचे म्हणणे असून तीन दिवसाआधी सरपंच यांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करतो व कामावरून काढून टाकतो अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोप केलेला आहे व शेगाव येथील आरो फिल्टर चे फिल्टरचे पैसे, पेटीतील पैसे ग्रामपंचायत मध्ये न ठेवता पेटीतुन परस्पर सरपंच काढून घेतात अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे, या सगळ्यामुळे ग्रामपंचायतीतील सर्व कर्मचारी यांनी मागील तीन दिवसापासून काम बंद आंदोलन केले असून जो पर्यंत सरपंचावर कारवाई होत नाही तो पर्यंत ग्रामपंचायत काम सुरू करणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे…

या प्रकरणी सरपंच पाटील यांना विचारणा केली असता मला याची कुठलीही कल्पना नाही कर्मचारी कामावर का आले नाही याची त्यांनी मला कल्पना दिलेली नाही मी याची माहिती घेऊन त्यानंतर आपणाला काय ते सांगतो असे त्यांनी संबंधित प्रतिनिधीला सांगितले आहे..

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!