निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी थंडीत काढली रस्त्यावर रात्र..
निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये रोष
चिमूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ चे दिनांक २० नोव्हेंबर ला सार्वत्रिक मतदान पार पडले मतदान शांततेत पार पाडल्यानंतर निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मतपेट्या तहसील कार्यालयात जमा केल्या. निवडणूक कर्तव्य हे राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना ते करणे बंधनकारक असते, परंतु हे कर्तव्य पार पाडत असताना चिमूरात वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागले.
क्षेत्रफळाने विस्तिर्ण असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात एका टोकावरून दुसऱ्या टोकावर निवडणुकीचे कर्तव्य बजावण्याकरिता जावे लागत असते. आणि मतदानाच्या आदल्या दिवशी साहित्य घेऊन सर्व व्यवस्था पार पाडावी लागते. मतदानाचे दिवसी पहाटे उठून दिवसभराचेराचे काम आटोपून या कर्मचाऱ्यांना मतपेटया तहसिल कार्यालयात रात्री उशिरापर्यंत जमा कराव्या लागतात. या निवडणूक कर्मचाऱ्यांना मात्र तहसील कार्यालयापासून आपल्या घरी जाण्याकरिता बसेसची सुविधा पुरविली नसते . दोन दिवसाचे निवडणूक कर्तव्य पार पाडल्यानंतर नाईलाजाने अशा कर्मचाऱ्यांना आपण ज्या ठिकाणी मतपेट्या पोहोचवलेल्या आहेत त्याच ठिकाणी आराम करावा लागतो.
परंतु चिमूर उपविभागीय कार्यालयाकडून चक्क “काम झालं माझ आणि काय करू तुझं ” असा वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. या राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना मात्र तहसील कार्यालय चिंमूर येथे टाकलेल्या पेंडालमध्ये मध्ये झोपू दिले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उघड्यावर जागत रात्र काढावी लागली. जर निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकाऱ्यांना त्या टाकलेल्या पेंडाल मध्ये झोपू देता येत नसेल, तर त्यांची पर्याय व्यवस्था करून देण्याची जबाबदारी उपविभागीय कार्यालयाची नाही का? एवढ्या रात्री उशिरा आपल्या गावी कसे जाणार ? असा प्रश्न पडतो. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांची रात्री निवासाची व्यवस्था करणे आवश्यक आहे . या सगळ्या प्रकारामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना हे निवडणूक अधिकारी धाक दाखवून काम करुन घेतात.






