भिसी येथिल मतदारांकडे उमेदवाराचे लक्ष .
भिसी येथे विक्रमी मतदान .
चिमूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक बऱ्याच ठिकाणी शांततेत पार पडली.
चिमूर विधानसभा क्षेत्रात सुध्दा किरकोळ ठिकाण वगळता, शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. काल दिनांक २० नोव्हेबर ला मतदान प्रकिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली.
सदर मतदान प्रक्रिया शांततेत, सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिमूर विधानसभा क्षेत्रात एकूण 13 उमेदवारांचे भाग्य आज या मतपेटीत बंदिस्त झालेले आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रात मुख्य लढत भाजपा चे किर्तिकुमार भांगडीया व काँग्रेस चे डॉ. सतिश वारजूकर यांच्यात असून हि निवडणूक भाजपाचे उमेदवार किर्तीकुमार भांगडीया तथा कॉग्रेसचे उमेदवार डॉ सतीश वारजुकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. यात घराणेशाही चा पगडा भारी की परिवर्तन होईल हे मात्र निकालानंतर स्पष्ट होईल.
भिसी येथे एकुण मतदार ८९१० त्यापैकी ७०७९ एवढे मतदान झाले असुन त्यामध्ये बूथ क्रं १०३ वर १२२४ पैकी ९६३ ,
१०४ वर ७८८६ पैकी ९३७ , १०५ वर १०९१ पैकी ८३९ , १०६ वर १०९६ पैकी ८७८ , १०७ वर १०२० पैकी ८५० , १०८ वर ११४९ पैकी ८६२ , १०९ वर ११६३ पैकी ८८० , ११० वर १०५९ पैकी ८७० मतदान झाले असून मतदानाची एकूण टक्केवारी ७९.४५% टक्के मतदान झाले आहे. एप्रिल २०२४ ला झालेल्या लोकसभेला ७६ टक्के मतदान झाले होते या ३.४५% वाढलेले मतदान नेमके कोणाच्या ओंजळीत पडतील…….? ते नेमके आम्हालाच मिळतील ! असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शहरातील मतदानापेक्षा ग्रामीण भागातील मतदान मोठ्या प्रमाणावर झाले हे विशेष. मात्र जनतेच्या मनात काय आहे, हे लक्षात यावयास २३ तारीखेपर्यंत सर्वांना वाट पहावी लागणार आहे. मात्र प्रत्येक पक्षाच्या लोकप्रतिनिधीमध्ये मीच निवडून येणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या उत्कठेकरिता मात्र सर्वांना २३ तारीख म्हणजेच शनिवारची वाट पहावी लागेल हे विशेष.






