दारू पिऊन धिंगाणा घातल्यानी थोडा वेळ तणावपूर्ण परिस्थिती
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अर्जुनी (तु ) या ठिकाणी आज विधानसभा साठी मतदान सुरु असताना दुपारच्या सुमारास मद्याधुद अवस्थेत असलेल्या एका इसमानी धिंगाणा घातल्यामुळे एकच गोंधळ उळाला होता.
प्राप्त माहिती नुसार दुपारी ४ च्या सुमारास स्थानिक अर्जुनी (तु.) येथील एक मद्याधुंद व्यक्ती जि. प. शाळेच्या बुथ वर मतदान करण्यासाठी आला होता. दरम्यान त्यांनी काही कारण नसताना तिथे धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. व निवडणूक प्रक्रिया पार पाडत असणाऱ्या स्त्री कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्या कारनांनी मतदान बुथ वर एकच गोंधळ उडाला व थोडा वेळ धावाधाव सुरु झाली. त्या नंतर तेथील इतर कर्माचारी तसेच तैनात असलेल्या पोलिस शिपाई यांनी त्याला पकडून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. प्ररंतु असा अचानक झालेल्या हल्यामुळे आणि उडालेल्या गोंधळामुळे मतदान बुथ वर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.






