प्रशासनाच्या चुकीमुळे लोकसभा निवडणुकी मधेही मतदानापासून होते वंचित….
शेगाव..
२० नोव्हेंबर ला होणाऱ्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेतील मतदान प्रक्रियेपासून अनेक मतदाते हे वंचित राहणार आहे. अनेक मतदार यांनी या आधी लोकसभा निवडणूक वेळी सुद्धा प्रशासनाच्या चुकी मुळे संपूर्ण महाराष्ट्रात कित्तेक मतदारांना मतदान पासून वंचित राहावे लागले होते. त्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रात या वर अनेक वृत्तपत्रात बातम्या झळकल्या होत्या. त्या नंतर परत जे मतदानापासून वंचीत राहले होते अशा मतदाराकडून ६ नं व ७ नं फार्म भरून घेण्यात आले तरी सुद्धा मतदान लिस्ट मध्ये नाव न आल्या मुळे या वेळी सुद्धा काही मतदारांना विधानसभा निवडणूक मध्ये आपले अमूल्य अशे मतदान करण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
एकीकडे शासन लाखो/ करोडो रुपये खर्च करून मतदारांना मतदान करण्यासाठी जाहिरात, लोकनाट्य व विविध प्रकारे जनजागृती करत आहे. पण दुसरीकडे प्रशासनाच्या काही चुकी मुळे कित्तेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची इच्छा असून सुद्धा मतदानाच्या प्रकियेपासून वंचित राहावे लागत असल्या कारणांनी मतदारकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे मतदारांच्या हा संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्कपासून वंचित ठेवण्याला जवाबदार कोन? व लोकसभा च्या वेळी झालेली चुकी विधानसभा निवडणुकातही कशी होऊ शकते? हा असच गोंधळ हर वेळेला होणार असेल तर निवडणूक अधिकारी करतात तरी काय? असे एक ना अनेक प्रश्न नागरिक करीत आहे. व निवडूक विभाग आता या वर काय उपयोजना करणार आहे असा सुद्धा प्रश्न नागरिक करीत आहे..






