भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे इयत्ता आठवी प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर अध्यक्ष डॉ. जयंत वानखेडे, विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्रमुख अतिथी डॉ. सुधीर मोते, प्राचार्य, यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती व सेवाजेष्ठ शिक्षक उमेश पाटील उपस्थित होते.
“शालेय शिस्तीसाठी गणवेश आवश्यक असून ती आपली एक वेगळी ओळख निर्माण करते. आपले व्यक्तिमत्व अधिक खुलवते, यासाठी आपण नियमित गणवेशातच शाळेत उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन माजी प्राचार्य डॉ जयंत वानखेडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास कोल्हे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश नंदनवार सर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






