भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुधीर मोते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा नरेश जांभुळकर प्रा. किशोर ढोक व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी “अजितदादा पवार हे सामान्य कुटुंबातील स्वतःच्या कर्तुत्वने मोठे झालेले व्यक्तिमत्व असून त्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी विकासाची कामे केल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. हरिहर मोहरकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा रमेश चव्हाण सर यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.






