spot_img
spot_img
25.1 C
New York
Tuesday, August 4, 2026

चिमूर विधानसभेमध्ये आमदार किर्तीकुमार भांगडिया यांची विजयाची हॅट्रिक साधत ऐतिहासिक विजय………

चिमूर विधानसभेमधील पहिली हैट्रिक………..

चिमूर विधानसभेतून विद्यमान आमदार अधिकृतरीत्या विजयी घोषीत……….

चिमूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्रात सत्तेच्या सारीपाटात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अतिशय चुरशीच लढत बऱ्याच ठिकाणी बघायला मिळाली. आज त्याचा अधीकृत निकाल लागला. हा निकाल मात्र बऱ्याच जणांना धक्का देऊन गेला. ७४ चिमूर विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ ला झालेल्या निवडणुकीची आज तहसील कार्यालय चिमूर येथिल राजीव गांधी सभागृहात चिमूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यात आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. सतिश वारजूकर यांचा ९५८३ मतांनी पराभव करून चिमूर विधानसभेत पहिल्यादा हॅट्रिक साधण्याचा मान मिळवला.

आज निकालात मतमोजणीत सुरुवातीपासूनच कधी काँग्रेस तर कधी बीजेपी यांच्या काट्याची लढत चाललेली होती. कधी भांगडिया समोर तर कधी मागे असे चित्र दिसत होते . त्यात कोण विजय संपादन करेल हे मात्र शेवटीपर्यंत सांगणं अशक्य होतं. मात्र या निवडणुकीत आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी विजयी हॅट्रिक संपादन करत ऐतिहासिक विजय प्राप्त केला. या अगोदर विजय वडेट्टीवार यांनी दोन टर्म सतत निवडून येत चिमूर विधान सभेत आपले नाव कोरले होते. परंतू आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी चिमूर विधानसभेमधून सलग तिसऱ्यांदा ९८५३ मतांनी निवडून येत हा रेकॉर्ड मोडीत काढत व विजयाची विक्रमी हॅट्रिक साधत चिमूर विधानसभेत एक ऐतिहासिक विजयी नाव कोरले.

त्यांच्या या विजयाबद्दल चिमूर शहरात, भिसीत तसेच संपूर्ण चिमूर विधानसभा क्षेत्रात जंगी विजयी रॅली काढण्यात आली. त्यांच्या या हॅट्रिक विजयाबद्दल यशोदा बहुउद्देशीय शिक्षण संस्था भीसी व्दारे त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!