वरोरा क्षेत्रातील रखडलेल्या समस्यावरून नागरिकांत विविध चर्चाना उधाण
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहत असताना वरोरा भद्रावती क्षेत्रातील रखडलेल्या विकासाच्या मुद्द्यावर ग्रामीण भागातील जनतेत मोठ्या प्रमाणत नाराजी दिसून येत आहे.
त्यात प्रामुख्याने वरोरा चिमूर हायवेचा चा विषय असो कि ग्रामीण भागातील रस्त्याचा.
पाण्याचा असो कि स्वास्थ सुविधांचा, मागील १० वर्षां पासून रखडलेल्या सुविधानबद्दल ग्रामीण जनतेमधून लोकप्रतिनिधी बद्दल मोठ्या प्रमाणात नाराजीचे सुरु निघत आहे.
सध्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पंचरंगी लढत होणार आहे. यामध्ये मुख्य लढत शिव सेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे, प्रहार कडून उमेदवारी मिळालेले अहतेशाम अली व वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार व स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे भाऊ अनिल धानोरकर यांच्यात त्रिशंकू लढत होणार असे ग्रामीण भागतील चित्र दिसून येत आहे. त्यातच वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून पहिल्यांदा मुस्लिम उमेवाराला उमेदवारी मिळाल्यामुळे संपूर्ण मुस्लिम बांधवांचा व वरोऱ्यातील केलेल्या विकास कामामुळे वरोऱ्यातील जनतेचा त्यांना पाठींबा असल्याचे दिसून येते. तसेच बचूभाऊच्या प्रहारचा पण त्यांना खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मुकेश जिवतोडे हे मागील काही वर्षां पासून ग्राउंड लेवलवर काम करीत असल्या कारणांनी त्याचा मोठ्या प्रमाणात मुकेश जिवतोडेला फायदा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या उलट इंडियन कांग्रेस ने ऐन वेळेवर चर्चेत असलेल्या चेहऱ्यांना डावलून विद्यमान खासदार यांच्या भावालाच उमेदवारी दिल्याने मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये नाराजि असल्याचे दिसत आहे. व घराणेशाहीच्या विरोधाचा सुरु जनतेमध्ये पाहायला मिळत आहे. त्यातच मागील ५ वर्षां पासून एकच घरात आमदारकी आणि खासदारकी असताना सुद्धा रखडलेली विकास कामे या विधानसभा निवडणुकीत कुठे तरी जनतेमध्ये नाराजी निर्माण करीत असल्याचे चित्र मात्र दिसून येत आहे.
तसेच भाजपचे उमेदवार करण देवतळे हे सुद्धा या मध्ये चांगलीच मत घेतील असे चित्र दिसून येत आहे.






