भाजप महायुतीचे उमेदवार आ. किर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या प्रचार सभेसाठी
चिमूर प्रतिनिधी:-
विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर वाढलेला असतानाच 74 चिमूर विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार किर्तिकुमार ऊर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रचार सभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या मंगळवार दि. 12 नोव्हेंबर 2024 ला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पद स्पर्शाने पावन झालेल्या चिमूर क्रांती भूमीत आगमन होत आहे.
या देशाचे पंतप्रधान इतिहासात पहिल्यांदाच चिमूर नगरीत येत असल्याने मतदारसंघात व मतदार राजात उत्साह दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून भिसी मार्गावर असलेल्या नविन भांगडीया वाड्याच्या बाजुला असलेल्या भव्य मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली असून, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या होणाऱ्या सभेसाठी भव्यदिव्य शामियाना उभारण्यात आला आहे.
महायुतीचे उमेदवार आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या विजयाची हॅट्रिक साधणार काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी चिमूर येथे येत असल्याने मतदारांत विविध चर्चा सुरू झाली आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चिमूर क्रांती भूमीत येणार असल्याने महायुतीच्या समस्त कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सभेतून काय फलित साध्य होणार हे २३ नोव्हेंबर लाच कळेल.






