भद्रावती,
दि.१२(तालुका प्रतिनिधी)
येथील जवळे प्लाॅटमधील रहिवासी आणि आयुध निर्माणीतील सेवानिवृत्त कर्मचारी रामदास येरगुडे यांचे अल्पशा आजाराने दि.११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
मृत्यूसमयी ते ६९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथील बिनबा गेट मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आप्तेष्ट व नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा भद्रावतीचे सदस्य विलास येरगुडे यांचे ते वडील होते.






