नरहरी नामदेव माने यांचे दुखःद निधन.
मुंबई
कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य चे सचिव प्रा. बाळासाहेब माने यांचे वडील मा. श्री. नरहरी नामदेव माने यांचे आज सायंकाळी ७.३० वाजता च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. श्री नरहरी नामदेव माने हे प्राथमिक शिक्षक होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन , दोन मुली , जावई, नातवंडं व बराच मोठा आप्तपरिवार आहे . उद्या अकराच्या सुमारास अंत्यविधी त्यांच्या राहत्या घरी, वांगी नं.१ ता. करमाळा जि. सोलापूर या ठिकाणी होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा प्रतिनिधी व महाराष्ट्रातील सर्व मराठी विषय शिक्षक हे माने कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






