एकाच आठवडयातील दुसरी घटना
किशोर आष्टनकर चिमूर प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील भिसी येथे जंगल परिसरात जुगार खेळल्या जात आहे अशी खबर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी लक्ष केंद्रित करून शुक्रवार रात्री अंदाजे आठ वाजता सापळा रचला. दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जुगारावर धाड टाकली असता, यामध्ये जुगारी व्यक्तींना पकडून जुगाऱ्यांच्या मुसक्या आवरत कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये A P I जितेंद्र चांदे यांच्या मार्गदर्शनात भिसी पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ताई पाटील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाघ सहाय्यक फौजदार भास्कर आत्राम, दिलीप , पोलिस अंमलदार लोकेश खोब्रागडे , मनोज गायकवाड यांचे पथकाने तयारी करून भिसी जंगल परिसरात सापळा रचून जुगारावर रेड केली. या धाडीमध्ये सदर घटनास्थळावर जुगार खेळताना पाच व्यक्तीविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये पोलीस स्टेशन भिसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस कारवाईत घटनास्थळी ६१ हजार ७७५ रुपयांची नगद रोख रक्कम जप्त करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास A P I जितेंद्र चांदे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पाटील करित आहे . एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून, ४ आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.






