spot_img
spot_img
26.6 C
New York
Saturday, August 1, 2026

सर्प मित्राने दिले कोब्रा जातीच्या सापाला जीवदान

पर्यावरण प्रेमी, जगदीश पेंदाम यांचे शेकऱ्यांना सापाला न मारण्याचे आवाहन…

वरोरा

वरोरा तालुक्यातील दादापूर येथील शेतकरी वामन कोटकर यांचे शेतामधील विहारिमध्ये कोब्रा जातीचा साप (ग्रामीण भाषेत गव्हाऱ्या ) हा २ दिवसा आधी रात्रीच्या सुमारास पडला आहे. व सध्या शेतामध्ये धान कापणी, कापूस वेचणी काम सुरु असून पाणी पिण्या साठी त्याच विहारिवर जावे लागते. पाणी पिण्यासाठी विहारिमध्ये बादली टाकली कि तो साप फना काडून बादली वर येतो त्यामुळे शेतमजूर हो घाबरलेले असून शेतात कामा साठी येत नाही असे त्यांनी फोन वर सर्प मित्र जगदिश पेंदाम यांना सांगितले.


जगदीश पेंदाम हे मागील १५ वर्षा पासून पर्यावरण क्षेत्रामध्ये पर्यावरण प्रेमी, म्हणून काम करत आहे व आजूबाजूच्या गावात परिसरात सर्प निघाल्यास ते धावून जातात व लोकांना योग्य ते मार्गदर्शन करून वन्य प्राण्याचे तसेच सापाचे प्राण वाचवण्याचे कार्य ते करतात.
या वेळी सुद्धा त्यांना फोन वर माहिती मिळाल्यावर ते वामन कोटकर दादापूर यांचे दादापूर येथील शेतात पोहचून मोठ्या मेहनतीने त्या विहरीतील सापाला बाहेर काढले व आपल्या जवळील कापडी पिशवीत बंद करून जंगलात नेऊन सोडून दिले..
यावेळी सर्प मित्र यांनी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केले कि सध्या शेती हंगाम सुरु असून शेतातील धानात, पराठी, तूर व चणा ( हरबरा ) या मध्ये मोठ्या प्रमाणात साप असतात. तेव्हा बोहत्येक शेतकरी त्यांना मारून टाकतात तर शेतकऱ्यांनी सापाला मारू नये. साप हा आपला शत्रू नसून मित्र आहे. जर कोणाच्या शेतात, घरात, अथवा परिसरात साप निघाल्यास अथवा दिसल्यास त्याला न मारता जवळपास वन विभागाचे अधिकारी तसेच सर्प मित्र यांना संपर्क करावा असे आवाहन सर्प मित्र जगदीश पेंदाम यांनी केले..

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!