ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची भरारी..
किशोर आष्टनकर
प्रतिनिधी भिसी:
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे होत असलेल्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवाकरीता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या इंद्रधनुष्य संघाची नुकतीच निवड झाली. विद्यापीठाच्या या संघात कला व वाणिज्य महाविद्यालय भिसी येथील साक्षी शेंडे, साक्षी ढेंगरे व निखिल दिघोरे यांची निवड करण्यात आली असून विद्यापीठाच्या संघात ते प्रतिनिधित्त्व करीत आहेत.
राज्वियस्तरीय होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे सर्व विद्यापीठ सहभागी होणार आहेत. या राज्य स्तरीय स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या इंद्रधनुष्यसंघात या विद्यार्थ्यांची निवड होऊन ते आंतर महाविद्यालय राज्यस्तरीय स्पर्धेत गोडवाना विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहेत . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देऊन आपली निवड विद्यापीठाच्या संघात केल्याबद्दल व त्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . संस्थेचे पदाधिकारी डॉ. रमेशकुमार गजबे, सुनील जावळेकर, संजय बोमेवार, दामोदर केदार व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे सिनेट सदस्य विजयकुमार घरत, कार्यकारी प्राचार्य डॉ विठ्ठल ठावरी, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. नत्थु गिरडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. दिनकर चौधरी, महाविद्यालयं विकास समिती सदस्य श्री प्रदिप कामडी, श्री किशोर आष्टनकर तसेच डॉ. राजेश सोनकुसरे, डॉ. सुनंदा चरडे, तिलक बांगडे, अरविंद लांडगे, जितेंद्र नन्नावरे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच या विद्यार्थ्यांवर परिसरातील नागरिकांनी अभिनंदनाचा वर्षाव करिता आहेत.






