spot_img
spot_img
22.3 C
New York
Thursday, July 30, 2026

विजेच्या खांबाला धडकून छोटा पिकअप पलटी

शॉट सर्किट होऊन वीज प्रवाह बंद झाल्याने मोठा अनर्थ टळला

पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असून सुद्धा अपघाताची नोंद नाही

वरोरा

वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ ई वर काल दि. १ ऑक्टोबर ला रात्री ९ ते १० चे दरम्यान सुझुकी कंपनीची कॅरी गाडी क्र. एम. एच. ३४ बी. झेड. ७३८९ ही शेगाव पोलीस स्टेशन जवळ एका विजेच्या खांबाला धडक देऊन जागीच पलटी झाली. ही धडक एवढी भीषण होती कि तो विजेचा पोल पूर्णपणे वाकला गेला व त्याचा धडकेचा आवाज आजूबाजूच्या लोकांना गेला त्यामुळे तिथे बग्याची गर्दी झाली. पोल जवळपास अर्ध्या पेक्षा जास्त खाली वाकल्यामुळे व त्यातून विजेचा प्रवाह सुरु असल्या कारणांनी वीज वाहणारी पोल वरील तार एकमेकांना शॉर्ट होऊन एक जोरदार तिडक्या उडायला लागल्या व विद्युत पुरवठा खंडित झाला. दरम्यान हायवे वर ही कॅरी गाडी पलटी झाल्याने व विजेच्या तारा अगदी जवळ आल्या कारणाने दोन्ही बाजूची वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. काही वेळा नंतर पोलिस व गावातील नागरिकांनी मिळून ति गाडी सरळ केली व पोलीस स्टेशन ला जमा केली. या गाडीचा ड्राइवर मद्य प्राशन करून असल्या कारणांनी हा अपघात झाल्याची त्या वेळी निष्पन्न झाले.


या वेळी सम्पूर्ण शेगाव मधील विद्युत ही जळपास २ तास बंद होती.
परंतु आज त्या घटनेला १८ तास होऊन सुद्धा स्टेशन डायरीवर कुठेही अपघाताची नोंद घेण्यात आलेली नाही.
तसेच आज ति अपघातग्रस्त गाडी सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये नसल्या कारणांनी जनतेमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आलेले आहे.


दुसऱ्या दिवशी त्या वाकलेल्या पोल वरील विजेचे तार हे एम. एस. ई. बी. विभागाकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या नविन पोल वर शिप्ट करण्यात आले. परंतु उर्वरित पोल च काय? हा प्रश्न अजून जनतेला पडलेला आहे.
आमचे प्रतिनिधी यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या घटनेची माहिती घेतली असता या बाबत स्टेशन डायरीवर कुठलीही नोंद नसल्याची माहिती तेथील अधिकारी यांनी दिली.

या मध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी त्या वाहणाचा ड्राइवर मद्य प्राशन करून असताना पण त्या वर कारवाही का करन्यात आली नाही. त्या घटनेचा मोका पंचनामा का करण्यात आला नाही तसेच कुठलीही नोंद न घेता ते वाहन पोलीस स्टेशन मधून सोडण्यात आलेच कसे?


म्हणेज पोलीस प्रशासन या पेक्षा मोठ्या दुर्घटनेची वाट तर बगत नाही ना?
कालच्या घटनेत वाहन मालक व पोलीस यांच्यात काही हितसंबंध तर जोपासले जात नाही आहे ना? असे एक ना अनेक चर्चाना जनतेमध्ये उधाण आलेले आहे.

तसेच हा राष्ट्रीय महामार्गचे काम मागील ७ वर्षा पासून सुरु असून स्थानिक शेगाव मध्ये रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सध्या दिवाळी सनामध्ये या रस्त्याला मोठी वरदळ असल्याने आणखी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर करून रस्त्याच्या मधा मधात असलेले विजेचे खांब लवकरात लवकर रस्त्याच्या कडेला हलविण्यात यावे अशी मागणी जनता करीत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!