इरई धरणामुळे पाणी रोखल्याने चंदनखेडा नदी नाल्यालगत असलेले शेतपिके पाण्याखाली नेहमीच होत असलेल्या या नुकसानीचा वाली कोण ?
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावालगत इरईनदी गेली असून या नदीवर चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राकरीता पाणी उपलब्ध करण्यासाठी धरण बांधण्यात आले आहे. त्यामुळे या धरणांच्या पाण्यामुळे प्रभावित होणारी शेती महाऔष्णिक विद्युत केंद्राने तत्कालीन वेळेस विकत घेऊन खरेदी केली. तसेच प्रकल्पग्रस्त म्हणून कुटुंब सदस्यास नोकरीत सामावून घेतले. परंतु दिवसेदिवस पाण्याचे क्षेत्र वाढत असल्याने त्याचा फटका इतर शेतजमिनीला बसत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा तिसरा पूर असून आजही चंदनखेडा परिसरातील नदीनाला थडीचे धान , कापूस , सोयाबीन , मिरची, तूर, हरभरा भाजीपाला आदी पिके पाण्याखाली आल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहेत. एकतर या केंद्राकडून शेताकडे जाण्यासाठी आतापर्यंत कुठल्याही पूल रस्ता किवा कुठलीही मदत CSR फंडातून दिली जात नाही. फक्त या शेतकऱ्यांचे नुकसान करून बळी घेण्याचे कार्य सातत्याने केल्या जात आहे. शासन , प्रशासन, लोकप्रतिनिधी या शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष देतील का ? असा आर्त टाहो नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत.






