spot_img
spot_img
22.6 C
New York
Tuesday, August 4, 2026

शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंची जिल्हा स्तरावर निवड….


क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर च्या वतीने तालुका क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भद्रावती येथील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय प्राप्त केला. ते भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्ह्यास्तरावर करणार आहेत.
१७ व १९ वर्ष वयोगटातील बॅडमिंटन संघात मुलींनी विजय संपादन केला. तसेच 19 वर्ष वयोगटाखालील मुलांनी बॅडमिंटन स्पर्धेत विजय संपादन करून जिल्हास्तरावर आपली नोंद निश्चित केलेली आहे. बुद्धिबळ स्पर्धेत १७ व १९ वर्षे वयोगटातील मुला , मुलींनी विजय संपादन करून भद्रावती तालुक्याचे नेतृत्व जिल्हास्तरावर करणार आहेत. भद्रावती येथील तालुका क्रीडा संकुलच्या इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या तालुकास्तरीय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष वयोगटाखालील मुलींमध्ये साहेबा सेख , कल्याणी बावणे व मुलांमध्ये अरविंद चौधरी यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत तालुकास्तरावर विजय मिळवून जिल्हास्तरावर भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच बुद्धिबळ स्पर्धेत 19 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ध्रुव गडिया व उत्कर्ष सातपुते यांनी विजय संपादन केला.
बॅडमिंटन स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील मुलींमध्ये अनुष्का वरभे, हरिप्रिया बाभुळकर, पलक नागपुरे, श्रेया जेंजीपेली यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत विजय संपादन केला. तर १९ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत गौरव तामगाडगे, तृणाक्ष मस्के, राजपाल चौधरी, आदित्य राजुरकर, श्रेयश खनके यांनी विजय संपादन करत जिल्हास्तरावर आपली निवड पक्की केली आहे .
या क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ जयंत वानखेडे तसेच प्राध्यापक डॉ. ज्ञानेश हटवार , किशोर ढोक, क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण , माधव केंद्रे यांनी अभिनंदन केलेले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचे श्रेय प्राचार्य डॉ जयंत वानखेडे व क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक रमेश चव्हाण यांना दिले .

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!