महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारा दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी ‘मेरी माटी मेरा देश’ या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत “वीरो को नमन “:हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे माजी कार्यकारी प्राचार्य रामकृष्ण मटाले अध्यक्ष म्हणून , तर भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख श्री पवन चटारे व महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री मनोहर बांद्रे हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते .
या कार्यक्रमात श्री बांद्रे व श्री चटारे यांनी ,”स्वातंत्र्य सेनानी तथा सीमेवर देशाचे रक्षक करणारे जवान तसेच देशांतर्गत भागात देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवणारे सुरक्षा जवान यांचा गौरवात्मक उल्लेख करून , शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. संदीप घोडीले यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






