spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

केसुर्ली गाव व शेत शिवारात दहशत पसरवणाऱ्या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करा

माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रफुल चटकी यांची मागणी

भद्रावती : नगरपरिषद क्षेत्रात येत असलेल्या भद्रावती शहरापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या केसुर्ली गावातील परिसरात मागील काही दिवसापासून पट्टेदार वाघाने दहशत पसरविलेली आहे. त्यामुळे केसुर्ली गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्या दहशत पसरवणाऱ्या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नगरपरिषद भद्रावतीचे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रफुल चटकी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, भद्रावती यांचे कडे केली.

केसुर्ली गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामुळे त्या गावातील नागरिक शेतीमध्ये कामासाठी जात असतात तसेच गावातील नागरिक मजुरीसाठी भद्रावती शहरात ये जा करतात. तसेच गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी भद्रावती शहरात येतात.

मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी त्या पट्टेदार वाघाने राजू खामकर यांच्या गायवर हल्ला केला होता. त्यात त्यांची गाय मरण पावली. गावातील व तिकडे येजा करणाऱ्या नागरिकांवर तो पट्टेदार वाघ हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर त्या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी भद्रावती नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रफुल चटके आणि केसुर्ली गावकरी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांच्याकडे केली आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!