spot_img
spot_img
23.1 C
New York
Saturday, June 6, 2026

विजेच्या कडकडाटासह वादळाचे थैमान…. पाच जनावरांचा मृत्यू

भद्रावती तालुक्यातील मांगली (रै.)येथील जगन्नाथ बाबा मंदिर परिसरात शेत शिवारात वीज पडून ५ जनावरांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या आकस्मिक घटनेत तीन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना २८ मे २०२३ रोजी रविवारला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. मांगली येथील रहिवाशी नानाजी उगे, विठ्ठल उगे, आणि शरद सातपुते यांच्या मालकीचे जनावरे आज भद्रावती चंदनखेडा मार्गा लागत असलेल्या जगन्नाथ बाबा मंदिर परिसरात शेत शिवारात चरत होती.

अचानक विजेचा कडकडाट व जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी वीज पडून मंदिर परिसरात पाच जनावरे दगावली . यामध्ये नानाजी उगे यांच्या मालकीचा एक बैल व एक कालवड , विठ्ठल उगे यांच्या मालकीचे दोन कालवड आणि शरद सातपुते यांच्या मालकीचा एक बैल मृत्यूमुखी पडला आहे . ऐन शेतीच्या हंगामाच्या सुरुवातीलाच जनावर दगावल्याने या तीनही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने यासंबंधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उचित आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरात केली जात आहे.

.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!