spot_img
spot_img
23.1 C
New York
Saturday, June 6, 2026

चंद्रपूर: चक्क उंटावरून निघाली लग्नाची वरात

अनोखा प्रकार, वेळेवर लावले लग्न…

भद्रावती येथे उंटावर वाजत गाजत ही वरात निघाली

चंद्रपूर : लग्नाची वरात घोडा, बैल बंडी, चारचाकी वाहन तथा विमानात देखील निघाली आहे. राजस्थान मध्ये उंटावर देखील नवरदेवाची वरात निघते. आता महाराष्ट्र मध्ये देखील उंटावर वरात निघाली आहे. या जिल्ह्यातील भद्रावती येथे उंटावर वाजत गाजत ही वरात निघाली आहे.

लग्न अविस्मरणीय व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते आणि मुलीची पाठवणी करताना आपल्या आयुष्यातील सर्व काही पणाला लाऊन वर पक्षांकडील मंडळींची बडदास्त ठेवली जाते.त्याचप्रमाणे आपले लग्न जगावेगळे व्हावे असे प्रत्येक नवरदेवाला वाटत असते. त्यामुळे लग्नाची वरात जास्तीत जास्त आकर्षक असावी, लग्नात मित्र परिवाराने मनमुराद आनंद लुटावा ह्यासाठी महागडे बँड, डी जे, लावून कुणी महागड्या गाड्या सजवून तर कुणी आकर्षक पांढऱ्या घोड्यावरून वरात घेऊन जातात.

भद्रावती तालुक्यातील आष्टा येथिल एम. ए. बी. एड्. असलेला कृषी केंद्र संचालक नवरदेव अमोल संतोषराव पडवे ह्याचे लग्न यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथिल जया देवरावजी वैद्य हिच्याशी ठरल्यानंतर विवाह सोहळा आपल्या गावातच करण्याचा निर्णय घेतला. आपले लग्न अविस्मरणीय व्हावे असे स्वप्न बघणाऱ्या अमोलने आपल्या लग्नाची वरात जगावेगळ्या पद्धतीने काढण्याचे ठरवून वरातीसाठी चक्क उंट मागवला व उंटावर बसुन थेट लग्न मंडपात पोहचला.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!