नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती चा निकाल उत्तम लागला असून , उत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे. बारावीच्या निकालात शिंदे महाविद्यालय तालुक्यातून अव्वल आहे.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती चा विज्ञान शाखेतील विद्यार्थी पियुष विलास राजूरकर याने ९२.८३% गुण घेतले असून तो विज्ञान शाखेत तालुक्यातून प्रथम आला आहे. तसेच महाविद्यालयातून सुद्धा प्रथम क्रमांकावर आहे. कु. गुंजन राजकुमार लुनावत या विद्यार्थिनीने ९२.५९% गुण प्राप्त करत तालुक्यातून द्वितीय स्थानावर आहे व महाविद्यालयातून सुद्धा दुसऱ्या स्थानी आहे. कु. वैष्णवी माधव केंद्रे ह्या विद्यार्थिनीने ८६.८३% गुण प्राप्त करत महाविद्यालयातून तिसरे स्थान पटकावले आहे. कु. प्रांजली नारायण बजारे हिने ८५% , कु. ऋतुजा अमितकुमार मोडक हिने ८४.५०% , कु. रक्षा देवराव उराडे हिने ८०.५० % तर अथर्व उमेश वैरागडे यांनी ८०.१७ % गुण घेतले असून या विद्यार्थ्यांनी नैपुन्य प्राप्त केलेले आहे. महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९८.०७ टक्के लागलेला असून , सात विद्यार्थ्यांनी ८०% च्या वर गुण प्राप्त केलेले आहेत.
या महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल सुद्धा उत्तम लागला आहे. कु. हिमांशी माधव चतारे हिने ७१.६७ % गुण घेतले असून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. मयुरी दिलीप ठमके हिने ७१.३३ % गुण प्राप्त केले असून ती महाविद्यालयातून दुसऱ्या स्थानावर आहे. कु. वैष्णवी अरविंद भोयर हिने ७०.३३% गुण घेतले असून ती महाविद्यालयातून तिसऱ्या स्थानावर आहे.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचा वाणिज्य विभागाचा निकाल हा ९२.३० % लागला आहे. वाणिज्य विभागात कु. झोया परवीन सय्यद हिने ८४.५०% गुण घेतले असून तालुक्यातून प्रथम व महाविद्यालयातूनही प्रथम क्रमांकावर आली आहे . कु प्रेरणा अनिल घाटे हिने ८१.५० % गुण प्राप्त करत तालुक्यातून द्वितीय व महाविद्यालयातून सुद्धा द्वितीय स्थानावर आहे. तर कु. रेवती सुधाकर घाटे या विद्यार्थिनीने ७८.३३% गुण घेत तालुक्यातून तिसऱ्या स्थानावर व महाविद्यालयातून तिसऱ्या स्थानावर आहे . कु. वैष्णवी मोरेश्वर तराळे हिने ७७.५० % गुण घेत तालुक्यातून चौथी व महाविद्यालयातून चौथ्या स्थानावर आलेली आहे.
एम सी व्हि सी विभागाचा निकाल हा सुद्धा उत्तम लागलेला असून कुमारी साक्षी मत्ते हिने ७१.१७ % गुण घेतले असून महाविद्यालयातून प्रथम आली. कु. रूपाली खामकर हिने ६५.६७% गुण घेतले असून ती द्वितीय स्थानावर आली तर कु. समीक्षा आवटे हीने पण ६५.५०% गुण घेत महाविद्यालयातून तिसऱ्या स्थानावर आली आहे.
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी नेहमीच बोर्ड परीक्षेत तसेच क्रीडा क्षेत्रात सुद्धा अव्वल असतात. ही गुणवंत ऊज्वल परंपरा याही वर्षी विद्यार्थ्यांनी कायम ठेवलेली आहे. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे , सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राध्यापक डॉ. सुधीर मोते, ज्ञानेश हटवार, नरेश जांभुळकर, सौ.ऊज्वला वानखडे, भिष्माचार्य बोरकुटे , हरिहर मोहरकर ,शेखर जुमडे व समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक प्रवासाला त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.






